सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा, काँग्रेसची मागणी
X
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबईत दुकाने ४ वाजपेर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण लोकल सेवा मात्र सामान्यांसाठी सुरू करण्याची सरकारची तयारी नाहीये. पण आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसनेच सर्व सामान्यांमसाठी लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मुंबईतील जनतेला सोयीस्कर व्हावे याकरिता मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल शहर यांना लोकल सुरू करण्यासंदर्भात विनंती केली आहे. मात्र लोकल सुरू करण्याचा विषय राज्य सरकारचा असल्यामुळे मुंबई महानगरपालिका यात काहीही करू शकत नाही, असे आयुक्तांनी सांगितल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रजी राजा यांनी सांगितले. मात्र मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आम्ही सातत्याने करीत आहोत, असेही रवी राजा यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात काही प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार निर्बंध हटवण्याच्या मनस्थितीतमध्ये नाहीय़े. पण आता सर्वसामान्यांसाठी लोकल बंद असल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. सार्वजनिक बस किंवा खासगी वाहतूक हाच पर्याय असल्याने नागरिकांच्या प्रवासाच्या वेळत आणि खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडूनही लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.