जळगवामधील महिला वसतीगृहाबाबतचे आरोप खोटे - गृहमंत्री
X
जळगावमधील आशादीप महिला वसतीगृहात महिलांवर अत्याचार झाल्याप्रकरणी माध्यमांमध्ये आलेले वृत्त चुकीचे असल्याचे चौकशीतून समोर आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या ६ वरीष्ठ महिलांच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीमधून एका महिलेने केलेले आरोप साफ खोटे असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच त्या महिलेच्या आऱोपांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आणि या आरोपांची कोणतीही शहानिशा न करता बातमी देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
वृत्तपत्रामध्ये ही बातमी आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर सरकारने तातडीने याप्रकरणी चौकशीला सुरूवात केली होती. आता खोटे आरोप करणाऱ्या महिलेने वसतीग-हातील इतर महिलांना मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच तिचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.