Home > News Update > दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढणार, मालवाहतूकदार संपाच्या तयारीत

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढणार, मालवाहतूकदार संपाच्या तयारीत

All India motor transport congress announced support to farmer agitation

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढणार, मालवाहतूकदार संपाच्या तयारीत
X

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नवीन शेतकरी कायद्यांना देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडलेले आहे. जोपर्यंत सरकार हे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांचे हे आंदोलन देशभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे विविध कामगार संघटनांनी शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर देशभरातील मालवाहतूक दारांच्या संघटनेनेदेखील आठ डिसेंबरपासून आपल्या गाड्या बंद ठेवण्याचा इशारा दिलेला आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द केले नाही तर 8 डिसेंबरपासून आम्ही आमच्या गाड्या थांबवू असा इशारा मालवाहतूकदार संघटनेने दिल्याची माहिती बँक एम्प्लॉईज युनियनचे विश्वास उटगी यांनी दिलेली आहे. या संघटनेमध्ये सहभागी असलेल्या मालवाहतूकदारांच्या एकूण ९५ लाख ट्रक आहेत. त्यामुळे जर मालवहातूर संपावर गेले तर देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकूणच शेतकरी विरोधी या कायद्याच्या विरोधात आता देशभर आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारने केलेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता पुढील बैठक तीन डिसेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी होणार आहे. पण कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नाही हे आधीच शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीमध्ये नेमका काही तोडगा निघतो किंवा आंदोलन पुढे सुरूच राहते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेतकरी आंदोलनाला वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबा वाढतोय. वाहतूकदारांच्या संघटनेनं 8 डिसेंबरला चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे. तर बार कौन्सिलनेही पाठिंबा जाहीर केलाय. तर तिकडे हरियाणातल्या खाप पंचायतच्या लोकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

Updated : 2 Dec 2020 9:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top