Home > News Update > सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट होणार :मुख्यमंत्री

सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट होणार :मुख्यमंत्री

सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट होणार :मुख्यमंत्री
X

संपूर्ण राज्यात आणि देशात हळहळ निर्माण करणाऱ्या भंडाऱ्यातील दहा बालकांच्या अग्नीकांडाची काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व व शासकीय रुग्णालय यांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल चौकशी करीत असून या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे, ही समिती आता येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी यांना व्हीसीद्वारे सुरक्षा विषयक ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा व संबंधित विद्युत विभाग यांनी देखील आपल्या क्षेत्रातील शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देऊन वीज व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का याची तपासणी करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Updated : 14 Jan 2021 9:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top