Home > News Update > पात्र लोकांना लस मोफत देणार: देवेंद्र फडणवीस

पात्र लोकांना लस मोफत देणार: देवेंद्र फडणवीस

लसीकरणाबाबत महाविकास आघाडी गोंधळ, आदित्य ठाकरे यांनी का डीलिट केलं? लसीसंदर्भात काय म्हणाले फडणवीस...

पात्र लोकांना लस मोफत देणार: देवेंद्र फडणवीस
X

राज्यात लसीकरणाबाबत संभ्रम कायम आहे. 18 ते 45 वयातील लोकांना लस देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर

असल्याचं काही मंत्र्यांचं म्हणणं आहे. तर काही मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेला लस देण्यासाठी जागतिक टेंडर मागवण्यात येणार असल्याची घोषणा देखील करत आहेत. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं जाहीर करत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर केले जातील. जनतेच्या मनात संभ्रम नको म्हणून मी आधी केलेलं ट्वीट डिलीट करतोय. असं म्हणत त्यांनी त्यांचं ट्वीट डीलिट केलं आहे. त्यांनी पुर्वी केलेलं ट्वीट डीलिट केलं. या सर्व गोंधळावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा सरकारचा खरपूस समाचार घेतला.

कालही मनकी बात मध्ये मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं आहे. जे लोक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यांना लस दिली जाणार आहे. ज्या खाजगी आस्थापना आहेत. त्या स्वत:च्या पैश्यातून लस घेऊ शकतात. मात्र, सर्व भारतीयांसाठी लस ही मोफत असणार आहे. असं फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

राज्यात मोफत करोनाची लस द्यायची का? याबाबत मत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही. राज्य सरकारनं मोफत लसीकरणाची दिशा ठरवली पाहिजे. तसंच केंद्राकडून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मदत दिली जात असून दररोज सकाळी उठून कांगावा करणाऱ्यांनी हा कांगावा बंद करावा. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे..

Updated : 26 April 2021 3:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top