Home > News Update > दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला निषेध

दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला निषेध

दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला निषेध
X

मुंबई // महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र निषेध केलाय. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे, असं शब्दात अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, या संतापजनक घटनेने मराठी भाषिक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठी भाषिक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. मराठी भाषिक हा लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, "सीमा भागातील मराठीभाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही.

कर्नाटक विधानसभेचे बेळगावात अधिवेशन काल सुरू झाले. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काल सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांनाही तसा दबाव आणला होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशातच अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न पेटला आहे.

Updated : 14 Dec 2021 7:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top