अजित पवार सरकारमध्ये सामील, तरीही भाजप श्रेष्ठींकडून शुभेच्छा नाही
X
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत. सरळ राजभवन घाढलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेऊन तब्बल १२ तास लोटले परंतु त्यांचे अजूनही केंद्राती बड्या नेत्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नाही. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने भाजप नेते नाराज आहेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
आपण पाहिले तर ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या अभिनंदनाचे ट्विट केलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देखील त्यांनी शिंदे शुभेच्छा दिल्या होत्या
देंवेद्र फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या
परंतु २ जून रोजी महाराष्ट्राचे दुसरे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या नसल्याने भाजपचे नेते पवारांच्या शपथविधीवर नाराज आहेत का असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे