Home > News Update > अजित पवाराचं कोरोनाला बाय बाय...

अजित पवाराचं कोरोनाला बाय बाय...

अजित पवाराचं कोरोनाला बाय बाय…,कोरोना मुक्त झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

अजित पवाराचं कोरोनाला बाय बाय...
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. २६ ऑक्टोबर ला अजित पवार यांनी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ट्विट करुन माहिती दिली होती.

आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल होत असल्याचं त्यांनी या ट्विट मध्ये म्हटलं होतं. माहिती दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरी सोडण्यात आले असून पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार आहेत. शिवाय कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत.


महत्वाच्या बैठकांना देखील उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा... कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे.


माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Updated : 2 Nov 2020 5:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top