अजित पवारांचे सर्व अधिकार काढले, जयंत पाटील यांना अधिकार
X
आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि अजित पवार यांच्या सोबत जे कोणी आमदार गेले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
हे ही वाचा
2014 ला भाजपाला पाठींबा देणं ही ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद
त्यानंतर आज संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यासोबतच अजित पवारांकडून सर्व व्हिप, पक्षनेत्यांचे अधिकारही काढले आहेत. हे सर्व अधिकार आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर हेडवरील एक पत्र राज्यपालांना दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या एकूण 54 आमदारांच्या सह्या आहेत. अजित पवार यांनी दिलेले हे पत्र आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यासाठी दिलं आहे.