Home > News Update > मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे ; बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण

मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे ; बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण

मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे ; बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण
X

मुंबई : मागील काही मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. मुंबईतील हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने मंगळवारी कुलाबा, माझगाव,मालाड,वांद्रे-कुर्ला संकुल येथील हवेची गुणवत्ता 'अतिशय वाईट' या श्रेणीत होती.

मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेगही मंदावला असून, हवेत 'पीएम २.५'चे प्रमाण वाढले आहे. कुलाब्यात मंगळवारी 'पीएम २.५'चे प्रमाण ३५३ तर 'पीएम १०'चे प्रमाण २०४ होते. तर मालाडमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ३२१ आणि १४७ होते. माझगाव येथे 'पीएम १०'चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र, 'पीएम २.५'चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा 'अतिशय वाईट' होता. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात 'पीएम २.५'चे प्रमाण ३१३ तर 'पीएम १०'चे प्रमाण २६३ होते. या सर्व ठिकाणी आज, बुधवारी देखील हवा 'अतिशय वाईट' दर्जाची असण्याची शक्यता आहे.

मोसमी पाऊस माघारी परतला असला तरी अरबी समुद्रात अधूनमधून निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. या काळात हवेचा वेग मंदावतो. त्यामुळे स्थानिक प्रदूषण आणि त्याच्या जोडीला परिसरातील सूक्ष्मकण साचून राहतात. शिवाय दिवाळी संपल्यानंतरही तुळशी विवाहाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरूच राहिल्याने मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला आहे.

Updated : 17 Nov 2021 9:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top