Home > News Update > ...म्हणून १ जानेवारीला राहणार पुणे - नगर महामार्ग बंद

...म्हणून १ जानेवारीला राहणार पुणे - नगर महामार्ग बंद

...म्हणून १ जानेवारीला राहणार पुणे - नगर महामार्ग बंद
X

कोरोनाच्या नव्या रुपातील विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित विषाणूबद्दल खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. अशात १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतता, त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहे.

दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगावला लाखो अनुयायी एकत्र येतात. पण यंदा कोरोनाचे संकट असल्याने लोकांनी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता १ जानेवारीला पुणे - नगर महामार्ग बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गावरिल वाहतूक ३१ डिसेंबर २०२०ला सांयकाळी पाच पासून ते एक जानेवारी २०२१ ला रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

नगरहून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

यामध्ये चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतुकही पूर्णपणे बंद असणार आहे. याशिवाय अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गे पुण्याकडे येतील.

नगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी जड वाहने ही खराडी बायबास येथून हडपसर, पुणे-सोलापूर महामार्गावरून चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर, नगर महामार्ग अशी वळवण्यात आली आहेत. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील

मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

मुंबई येथून नगरच्या बाजूने जाणारी जड तसेच माल वाहतुकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगरच्या बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वाडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगरकडे वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Updated : 25 Dec 2020 5:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top