Home > News Update > बायोडिझेलच्या अवैध विक्रीवर अहमदनगर पोलिसांचा छापा,पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त

बायोडिझेलच्या अवैध विक्रीवर अहमदनगर पोलिसांचा छापा,पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त

बायोडिझेलच्या अवैध विक्रीवर अहमदनगर पोलिसांचा छापा,पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त
X

अहमदनगर : नगर-सोलापूर रस्त्यावर वाटेफळ परिसरात नगर ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रस्त्याच्याच बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्‍या तस्करांवर छापा टाकला.

या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी 11 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे. यामुळे अवैध डिझेल विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत.

नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या बायोडिझेल विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दोन टँकरमधून वाहनांमध्ये बायोडिझेल भरले जात होते. पोलिसांना पाहताच तिथे पळापळ सुरू झाली. पथकाने 11 आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली.

अविनाश पोपटराव नाटक, मुजमील राजु पठाण , बंडू बाळासाहेब जगदाळे, चंद्रकांत शेखर , विजय अशोक वाडेकर , योगेश भगवान गंगेकर, अस्लम मुबारक सय्यद , सचिन दशरथ लामखडे , वाहन चालक अरूण माधयन, वेडीआप्पा गंगा दुरई , बाबासाहेब सखाराम बोरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

Updated : 3 Nov 2021 8:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top