Home > News Update > मुंबईच्या विकासासाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन गरजेची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईच्या विकासासाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन गरजेची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईच्या विकासासाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन गरजेची – पंतप्रधान नरेंद्र मोदी
X

मुंबईचा विकास करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा वाढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मुंबईच्या आणि देशाच्या विकासासाठी अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन ही गरजेची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित आहेत. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

हा प्रकल्प २०१५मध्ये पूर्ण झाला पाहिजे होता, पण २०१४ पूर्ण हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता. पण आमचे सरकार आल्यानंतर यातील सर्व अडथळे दूर करत आम्ही मुंबईकरांच्या सोयीसाठी तातडीने पावलं उचलली, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. पण मुंबईला आता येत्या काळात २१व्या शतकातील सुविधांची गरज आहे. त्यामुळेच देशाच्या आणि मुंबईच्या विकासासाठी अहमदाबाद-मुबंई हायस्पीड ट्रेन आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातून हा मार्ग जाणार आहे. पण महाराष्ट्रात या बुलेट ट्रेन प्रोजक्टला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळेच भूसंपादन देखील रखडले आहे. तसेच राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे कामही रखडले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात बुलेट ट्रेनची गरज अधोरेखित केली, अशी चर्चा आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी पाचव्या आणि सहाव्या लाईनसाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तसेच यापुढे देखील महाराष्ट्राला मोदी सरकारने सहकार्य करावे, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना मराठी येत असल्याने आपण मराठीत भाषण करणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी खासादार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचे आवर्जून सांगितले.


Updated : 18 Feb 2022 5:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top