Home > News Update > संगमनेरमध्ये कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ; विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

संगमनेरमध्ये कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ; विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

संगमनेरमध्ये कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ; विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
X

संगमनेर तालुकातील पठार भागात आज पंचायत समिती कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी अरुण जाधव मंडल कृषीधिकारी ,संकेत देशमुख कृषी सहाय्यक अधिकारी ,रवींद्र वाळवे कृषी पर्यवेक्षक ,शेंडेवाडी गावचे सरपंच ,उपसरपंच ,हिवरगाव पठार गावचे आदर्श ग्रामसेवक विजय भाऊ , सुभाष डोळझाके ,सुनील डोळझाके शेतकरी उपस्थित होते यावेळी कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्याच्यावतीने सत्कार करण्यात आला

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे कृषीधिकारी प्रवीण गोसावी यांनी शेतकऱ्यांना वातावरण बदलामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे परिणामी शेतकऱ्याने हतबल न होता धैर्याने सामना करावा तसे प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाणी महाराष्ट्र शासनाची लावून घ्यावी, तसेच शेतीमाल आयात आणि निर्यात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रकारचा हमीभाव भेटत नाही अशी खंत गोसावी यांनी बोलून दाखवली.

तसेच पठार भागातील शेतकरी सुनील डोळझाके यांनी जिरेनियम पद्धतीचे शेती फुलवण्याचं किमया पठारावर करून दाखवल्याने गोसावी यांनी त्यांचे कौतुक केले.

सोबतच कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन केलं जातं , त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, त्यासाठी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 28 Sept 2021 9:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top