Home > News Update > राज्यात परतीच्या पावसाची शक्यता, कुठे मुसळधार तर कुठे बरसणार सरी...?

राज्यात परतीच्या पावसाची शक्यता, कुठे मुसळधार तर कुठे बरसणार सरी...?

राज्यात परतीच्या पावसाची शक्यता, कुठे मुसळधार तर कुठे बरसणार सरी...?
X

राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. सध्या कोकणातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबई, ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरु झाला असून, मंगळवारी राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाच्या काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

आज आणि उद्या विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. वर्धा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मराठावाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील.

९ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १० ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या २४ तासांतील माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Updated : 8 Oct 2020 5:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top