Home > News Update > अवकाळी पाऊस; बीड जिल्ह्यात ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस; बीड जिल्ह्यात ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस; बीड जिल्ह्यात ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
X

मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. तर एकट्या बीड जिल्ह्यात १ हजार १०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे केले असून, परळी, धारूर व केज तालुक्यातील १ हजार १०३ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

१८ व १९ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात अनेक जिल्हात अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

Updated : 21 Feb 2021 11:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top