Home > News Update > कृषीमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषीमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत

कृषीमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर
X

अमरावती : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. तिकडे अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांबरोबरच शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नदी -नाल्यांना पूर आल्याने अमरावती जिल्ह्यातील शेती अक्षरश: खरडून गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच हवालदील झाला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

कृषीमंत्री भुसे यांनी अमरावती जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सोबतच त्यांनी कृषी विभाग , महसूल विभाग , ग्रामविकास विभागाला तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे पुर्ण करून नुकसानीचा आढावा घेत तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन कृषीमंत्री भुसे यांनी दिले आहे.

अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात मुख्यत: तूर, सोयबीन या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यासोबतच इतरही पिकांचं नुकसान झालं असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे होतील असं कृषीमंत्री भुसे यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला आहे. शेतकऱ्यांची विचारपूस करत सरकार तुमच्या पाठीशी आहे, आपल्याला तातडीने नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिलंय.


पीक विमा देण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना टाळाटाळ करण्यात येत होती. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत . सविस्तर माहिती देण्याचे टाळत असल्याच्या तक्रारी येत होत्या याचीच दखल घेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वतः इफकोटोकियो या विमा कंपनीमध्ये अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयात आवश्यक कार्यवाहीसाठी यंत्रणा आढळली नाही. त्याचप्रमाणे, शेतकरी बांधवांना विमा प्राप्त होण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. तर उपस्थित प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तर मंत्री महोदयांना मिळाले नाही त्यामुळे या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

Updated : 25 July 2021 12:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top