Home > News Update > पुणे मनसेच्या वतीने मंदिरे उघण्यासाठी घंटानाद आंदोलन

पुणे मनसेच्या वतीने मंदिरे उघण्यासाठी घंटानाद आंदोलन

पुणे मनसेच्या वतीने मंदिरे उघण्यासाठी घंटानाद आंदोलन
X

केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या वतीने आज राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.पुण्यातील जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद करून सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन केले. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान यावेळी बोलताना मनसेच्या रुपाली पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार सोयीचे राजकारण करत आहे, जेंव्हा शिवसेना आणि राणे भिडले होते तेंव्हा काय कोरोना लपून बसला होता काय? असा सवाल त्यांनी केला.

मंदिरं ही श्रद्धेनं डोकं टेकवण्याचं ठिकाण तर आहेच मात्र या मंदिरांवर अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. जेंव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न येतात तेंव्हा कोरोना येतो आणि सरकारच्या सोयीच्या वेळी कोरोना जातो असं पाटील यांनी म्हटले आहे.

Updated : 2 Sept 2021 6:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top