Home > News Update > रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा 43 व्या दिवशीही ठिय्या कायम

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा 43 व्या दिवशीही ठिय्या कायम

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आता दुसरा महिना सुरू आहे. आंदोलनाच्या ४३ व्या दिवशी आंदोलकांचे म्हणणे काय आहे ते पाहूया...

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा 43 व्या दिवशीही ठिय्या कायम
X

रायगड : रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांनी कंपनीबाहेर सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा ४३वा दिवस आहे. अजूनही या आंदोलनाची दखल ना कंपनीने घेतली आहे ना सरकारने घेतली नाही. आमच्या मागण्या रास्त व न्यायिक आहेत आणि आम्ही संयम, अहिंसा व संविधानिक मार्गाने आम्ही लढा देतोय, जेल व मरणाला आम्ही भीत नाही असा निर्धार आंदोलन संघर्ष समितीचे मुख्य राज्य संघटक राजेंद्र गायकवाड यांना व्यक्त केला आहे. आंदोलकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्र, नलिकाग्रस्त, वारस, कंत्राटी कामगार यांनी 27 नोव्हेंबर पासून आंदोलन पुकारले आहे. 43 व्या दिवशीही कडसुरे मटेरियल गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम कायम असून आजही आंदोलनकर्त्यांची जिद्द या आंदोलनात 482 प्रकल्पग्रस्त, 144 नलिकाग्रस्त, तसेच 14 एमआयडीसी शिक्का असलेले शेतकरी यांचा समावेश आहे, या सर्वांना रिलायन्स कंपनीत सामावून घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.


Updated : 8 Jan 2021 5:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top