Home > News Update > पुनः आपणास सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी खूप शुभेच्छा. आ. डॉ. विश्वजीत कदम

पुनः आपणास सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी खूप शुभेच्छा. आ. डॉ. विश्वजीत कदम

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आज अयोध्येत होत असलेल्या श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त आपल्या मतदारसंघातील जनतेस लिहिले खुले पत्र आणि दिल्या शुभेच्छा...

पुनः आपणास सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी खूप शुभेच्छा. आ. डॉ. विश्वजीत कदम
X

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आज अयोध्येत होत असलेल्या श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त आपल्या मतदारसंघातील जनतेस लिहिले खुले पत्र आणि दिल्या शुभेच्छा...

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी आज अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त आपल्या मतदारसंघातील जनतेस खुले पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वात प्रथम सप्रेम नमस्कार करून त्यांच्या शुभेच्छांना विश्वजित यांनी सुरुवात केली आहे. ते म्हणतात " माझ्या पलूस कडेगाव व सांगली जिल्ह्यातील बंधु भगिनींनो ,आज अयोध्येत पार पडत असलेला रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त सर्व जन एतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत, आणि माझ्यासाठी हा सात्विक आनंदाचा दिवस आहे अस आमदार आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

भारतीय समाज मनावर गारुड केलेल्या रामायणाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र हे परमेश्वराचे रूप आहेत हे करोडो लोकांना समजले. देशात अनेक ठिकाणी हजारो वर्षांपासून राम मंदिरे आहेत. हिंदू संस्कृतीतील परमेश्वररूप विठ्ठल रुक्मिणी, महादेव, हनुमान, गणपती, अंबाबाई, तुळजाभवानी, तिरुपती बालाजी या हिंदू देवी देवतांचे उत्सव एखाद्या सणाप्रमाणे देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात अशी आठवन आमदार विश्वजित यांनी करून दिली आहे. पुढे त्यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते स्व.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी सर्व जाती धर्माच्या धार्मिक स्थळांना केलेल्या मदतीला या पत्रात उजाळा देत ते म्हणतात की, स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी सर्व जाती धर्माच्या धार्मिक स्थळांच्या तसेच मंदिराच्या नूतनीकरणासाठी व विकासासाठी सर्वतोपरी मदत केली. धार्मिक सलोख्याची व आध्यात्म्याची परंपरा पुढे चालू ठेवली याचा विश्वजित कदम यांना आनंद असल्याच इथे नमूद करत आहेत.

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आज पार पडनार्‍या रामलल्लाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघातील तसेच सांगलीतील जनतेला विनम्र आवाहन केल आहे. आनंद सोहळा साजरा करत असतांना आपण सत्य-असत्य, न्याय-अन्याय, योग्य-अयोग्य, याच्या संघर्षात नितीमत्ता आणि प्रामाणिकपणास सर्वोच्च स्थान देणार्‍या प्रभू रामचंद्राच्या मूल्यांना समोर ठेऊन वाटचाल करुयात अस म्हंटलं आहे. श्रद्धेने श्रीरामाचे पूजन करीत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासत आपण कृतिशील राहण्याच आवाहन देखील डॉ. विश्वजीत कदम यांनी केल आहे.

Updated : 22 Jan 2024 1:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top