उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात पाठोपाठ गोव्यातही खांदेपालट? ; मुख्यमंत्रीपदासाठी राणेंच्या नावाची चर्चा
X
भाजपने उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता गोव्यातही तशीच खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. सध्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हटवून त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रमोद सावंत यांना तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे..
गोव्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. सध्या काठावरच्या पाठिंब्यावर गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत थोड्या जरी जागांवर पराभव झाला तर भाजपच्या हातातून गोव्यासारखं महत्वाचं राज्य जाऊ शकतं. त्यातच गोव्यात टीएमसी सक्रिय झाली आहे. केजरीवालांची आपही कामाला लागली आहे. टीएमसीनं तर एक माजी मुख्यमंत्रीच गळाला लावल्याने राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळे गोव्यात अचानक मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो असं समजतंय.
दरम्यान प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर त्यांच्या जागी कोण याबाबत चर्व्हेल उधाण आले आहे. विश्वजीत राणे आणि चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे