Home > News Update > Sharad pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Sharad pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Sharad pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा वाढदिवस देशभर साजरा करण्यात आला. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल केला आहे. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर येऊन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी हिंदीतून देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गागदेव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 294, 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Death Threat call to Sharad pawar)

काल शरद पवार यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याने पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली आहे.

कर्नाटक प्रकरणावर शरद पवार यांनी घेतली होती भूमिका (Sharad pawar on border dispute)

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर शरद पवार यांनी भूमिका घेतली होती. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सीमाभागात होत असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे लक्ष देऊ शकत नसतील तर मी स्वतः सीमाभागात जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण काहीसे थंड झाले. मात्र त्यापाठोपाठ शरद पवार यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे हा फोन करणाऱ्या व्यक्तीने खोडसाळपणातून फोन केला आहे की त्यामागे इतर काही कारणे आहेत? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येईल.

Updated : 13 Dec 2022 12:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top