Maharashtra politics : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय
X
शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्वांनाच ७ दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. यानंतर शिंदे गटात हालचालीला वेग आला आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 15 आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्रता प्रकरणात नोटीसा बजावल्या असून 7 दिवसात त्यावर मत मांडण्याचे आहे. या संदर्भात बैठकित कायदेशीर सल्ला आणि चर्चा केली जाणार असल्याची माहीती मिळतेय.
राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच त्यांचा हा निर्णय आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर यावर शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून या नोटीसला उत्तर देण्यासाठी वाढीव वेळ मागितला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 14 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयासंदर्भात प्रक्रिया सुरू असून विधानसभा अध्यक्ष लवकरच याप्रकरणी निर्णय देणार आहेत.