गोवरमधून बरं झाल्यानंतरही ताप आणि सर्दीचा धोका
X
मुंबईसह राज्यात बालकांवर गोवरची लागण होत असताना आणखीन एक धक्कादायक माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. जे बालक गोवरच्या लागण मधून बरे झाले आहेत. त्यांना पुढील एक महिन्यात सर्दी आणि ताप होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असा इशारा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्दी आणि ताप या आजारांमुळे पुन्हा बालकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागत असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्याचे आव्हान देखील महानगरपालिकेने केले आहे.
लसीकरण न झालेल्या, रक्तक्षय आणि कुपोषित असणाऱ्या बालकांना गोवरची लागण होत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा बालकांवर उपचार करण्यासाठी सक्षम असून देखील बालकाची रोगप्रतिकार शक्ती लगेच वाढत नाही. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती पूर्ववत होण्यासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. रोगप्रतिकार शक्ती पूर्ववत नसल्यामुळे खोकला, सर्दी, ताप, या आजारांची शक्यता महानगरपालिकेकडून वर्तवली जात आहे.
त्यामुळे पुढील एक महिन बालकांच्या पोषण आहाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राज्य सरकारकडून लसीकरणासाठी परवानगी आल्यानंतर आतापर्यंत मुंबईत दीड लाख बालकांनी लस घेतली आहे. गोवरचे सर्वाधिक रुग्ण भिंवडी शहरात आढळून येत असल्याने क्वारंटाईन सेंटर बनवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.