पवार घराण्यात फूट, मुंडे बहिण भाऊ एकत्र येणार का? पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुंडे-बहिण भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
X
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पवार घराण्यात फूट पडल्याचे समोर आले. मात्र दुसरीक़डे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. त्यामुळे पवार घराण्यात फूट पडली असतानाच मुंडे बहिण भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार दिवसापुर्वी ते इकडच्या बाजूला कामानिमीत्त आले होते. त्यावेळी ते घरी आल्याने बहिण म्हणून मी औक्षण केले. मात्र त्यांनी तो फोटो आज का ट्वीट केला हे माहिती नाही. त्यामुळे मुंडे बहिण भावात समेट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी पंकजा मुंडे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
धनंजय मुंडे यांनी काय केले होते ट्वीट?
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून म्हटले होते की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यंनी माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणूतन मी सुद्धा पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच पुढे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.