#Toolkit दिशा रवीनंतर बीडच्या शंतनू यांच्या घरी पोलिसांची कारवाई
X
शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेनंतर पोलिसांनी तिचे सहकारी निकिता जेकब आणि शंतनू यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. निकीत जेकब यांनी मुंबई हाय कोर्टामध्ये पोलिसांच्या या कारवाईला आव्हान दिले आहे.
तर बीड शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशी साठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांनी शंतनूच्या घराची तपासणी केली असून शंतनूच्यानू आई वडिलांची चौकशी केली आहे. तसेच बँकेत जाऊन देखील खात्यांचा तपशील घेतला आहे. पण शंतनूची नाहक बदनामी केली जात असून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शंतनू हा बी ई मॅकेनिक आहे. तसेच त्याने अमेरिकेत पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. "शेतकरऱ्यांसंदर्भात तळमळ असून शेतकरी आंदोलनाला शोषल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मी शेतकऱ्याची मुलगी म्हणून पाठींबा दिला आहे. मात्र त्यामुळं आमची चौकशी केली जातेय.शंतनूचे आणि आमचे 8 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. पुन्हा बोलणं झालं नाही म्हणून चिंता वाटतेय" अशी प्रतिक्रिया शंतनूच्या आईने दिली आहे.
तर "शंतनू हा औरंगाबादमध्ये जॉब करत होता. पुण्यात नव्याने काही सुरू करावे म्हणून गेला होता. आठ दिवसा पूर्वी त्याचे माझं बोलणं झालं. त्यानंतर काहीच बोलणं झाले नाही. दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांचे चे दोन अधिकारी आमची चौकशी करत आहेत. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. शंतनू पर्यावरणा संदर्भात काम करतो" अशी माहिती शंतनूचे वडील शिवलाल मुळूक यांनी दिली.