देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बैठक
X
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यातच शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहे. आज 5 वाजता ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत पक्ष कार्यालयात बैठक घेणार आहेत.
त्यामुळं फडणवीसांसोबत झालेली बैठक आणि आज थेट फक्त राष्ट्रवादींच्या मंत्र्यांसोबत होणारी बैठकशरद पवारांची बैठक याचा काही राजकीय संबंध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान शरद पवार राजकारणात सक्रीय नसताना राष्ट्रवादीचा पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत झालेला पराभव, मराठा आरक्षणाचा आलेला निकाल, पदोन्नती आरक्षण या सर्व मुद्यावर पवार चर्चा करण्याची शक्यता आहे.
मात्र, या बैठकीत काल झालेल्या पवार आणि फडणवीसांच्या भेटीचं काही कनेक्शन आहे का? पवार आपल्या मंत्र्यांसोबत काय चर्चा करणार? या बैठकीचे पडसाद महाविकास आघाडीवर कसे पडतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे. खासकरून शिवसेना या भेटीकडे कसे पाहते. यावरुन महाविकास आघाडीची पुढची राजकीय दिशा ठरणार आहे.