Gautam Adani : अदानींसाठी दुष्काळात तेरावा..
हिंडरबर्गनं एक अहवाल प्रसिध्द करुन भारतीय उद्योजक गौतम अदानींचं (Gautam Adani) पितळ उघडं केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. मागील पाच दिवसात अदानी समूहाच्या बाजार भांडवलात 39 टक्क्यांची घसरण झाली असताना आहे. स्विर्त्झलंडमधील क्रेडिट सुईस या संस्थेनंतर आता अदानी ग्रुपला अमेरिकेतील सिटी ग्रुपकडून धक्का बसला आहे.
X
हिंडरबर्गनं एक अहवाल प्रसिध्द करुन भारतीय उद्योजक गौतम अदानींचं (Gautam Adani) पितळ उघडं केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. मागील पाच दिवसात अदानी समूहाच्या बाजार भांडवलात 39 टक्क्यांची घसरण झाली असताना आहे. स्विर्त्झलंडमधील क्रेडिट सुईस या संस्थेनंतर आता अदानी ग्रुपला अमेरिकेतील सिटी ग्रुपकडून धक्का बसला आहे.
अदानींची कोंडी
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. क्रेडिट सुईस या खासगी बँकिंग कंपनीने अदानी समूहाला धक्का दिला आहे. अदानी समूहाच्या बाँड आणि सिक्युरिटीची व्हॅल्यू झिरो केली आहे. क्रेडिट सुईसने केलेल्या कारवाईनंतर अदानी समूहाच्या शेअर दरात 25 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. क्रेडीट सुईसनंतर अमेरिकेतील सिटी ग्रुपनेदेखील अदानी समूहातील कंपनीची लँडिंग व्हॅल्यू हटवली आहे. सिटी ग्रुपच्या वेल्थ युनिटने अदानी समूहाच्या बाँडवर कर्ज देण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेत झालेल्या या कारवाईनंतर आता अदानी समूहाच्या शेअर दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेने मागवली माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील बँकांना अदानी समूहातील त्यांच्या एक्सपोजरबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तनुसार, सेबीनेही या प्रकरणी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. अदानी ग्रुपमधील जवळपास सर्व शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 38.2 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या पाच दिवसांत अदानी शेअर्स 38.7 टक्क्यांनी घसरले आहेत.
100 अब्ज डॉलरचे नुकसान
अदानी (Adani Group) समूहाला आठवड्याभरात शंभर अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. शंभर अब्ज डॉलर ($100 billion) भारतीय मूल्य 8.23 लाख कोटी आहे. अदानी समूहाच्या भांडवली बाजार मूल्यात (cumulative market capitalization loss) ही घसरण झाली आहे. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी हिंडनबर्ग रिसर्च बिनबुडाचा असल्याचा दावा केला आणि अदानी समुहातील सर्व कंपन्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याचा दावा केला तरी विक्रीचा सपाटा थांबला नाही. फोर्ब्स मासिकानं जाहीर केलेल्या क्रमवारीत जगातील तिसऱ्या श्रीमंतीच्या क्रमांकावरुन अदानी १७ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. हा एफपीओ बुधवारी मागे घेण्यात आला. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले होते.
अदानीच्य़ा संकटामुळे महाराष्ट्राला झटका
गौतम अदानीच्या कंपन्यांची मुख्य कार्यालयं मुंबईत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्पांची कंत्राटं अदानींना देण्यात आली आहेत. गौतम अदानीच्या तीन मल्टी बिलियन प्रोजेक्टच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे तीनही प्रकल्प मुंबईत आहेत. त्यात धारावी रिडेव्हलपमेंट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, आणि नवी मुंबई वीज वितरण या प्रकल्पांचा समावेश आहे.या प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे. मात्र हिडेनबर्गच्या अहवालानंतर त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धारावी पूर्नविकास प्रकल्प हा ३०० हेक्टर जमीनीवर तयार होत आहे. तर नवी मुंबई वीज वितरणाचा व्यवसाय अंबानींनी २०१८ मध्ये खरेदी केला होता.मंत्र्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार महाराष्ट्र सरकार या महिन्यात अदानी समुहासोबत एक सामंजस्य करार करणार होते. पण आता हा कराराचे भवितव्य धुसर झालं आहे.