Aditya L_1 चंद्रयानानंतर आज सुर्ययान
यशस्वी चंद्रयान मोहिमेनंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एलवन मोहीम आज राबविण्यात येणार आहे
X
भारताला जागतिक अंतराळ विश्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या चांद्रयान-३च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अदित्य L1चं आज प्रक्षेपण होणार आहे.
यशस्वी चंद्र मोहिमेनंतर भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या आदित्य एल वन यानाचे आज, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) प्रक्षेपण होणार आहे.
आदित्य एल वन यान त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील,’ अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
या मोहिमेपूर्वी सोमनाथ यांनी तिरुपती जिल्ह्यातील चेंगल्लम्मा परमेश्वरी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आदित्य एल वनची उलटगणती (शुक्रवार) सुरू झाली. शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण केले जाईल. सूर्याचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे,’ असे सोमनाथ यांनी सांगितले.
चांद्रयान-४बाबत अद्याप काहीही ठरविण्यात आलेले नाही. आदित्य एल वननंतरची आपली पुढील अवकाश मोहीम गगनयान आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गगनयानाचे प्रक्षेपण केले जाईल असे -एस. सोमनाथ, संचालक, इस्रो यांनी यावेळी सांगितले.
२३ तास ४० मिनिटे
‘आदित्य एल वन’च्या उलटगणतीच कालावधी
स. ११.५०
यानाच्या प्रक्षेपणाची वेळ
कुठे पाहता येईल थेट प्रक्षेपण?
‘इस्रो’ची वेबसाइट https://isro.gov.in
‘इस्रो’चे फेसबुक पेज https://facebook.com/ISRO
‘इस्रो’चे यूट्यूब चॅनेल https://youtube.com/watch?v=_IcgGYZTXQw
डीडी नॅशनलवर सकाळी ११.२०पासून