संसदेवर शेतकऱ्यांचा मोर्चा आठवड्याभरानंतर
X
शेतककऱ्यांच्या विविध प्रश्नावर संसद भवनावर निषेध मोर्चा काढण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आता आठवड्यानंतर पुन्हा संसदेवर धडकणार आहॆ.
काल संसदभवनावर निषेध मोर्चा काढण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यूपीतील नोएडामध्ये रस्त्यावर उतरले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. पण पुढे गेल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना रोखण्यात आले. या वेळी सुमारे ५ किमी महामार्ग जाम झाला होता.
काही काळानंतर आंदोलक, शेतकरी व अधिकाऱ्यांसह आठवड्यात मुख्य सचिवांशी चर्चा करण्यावर एकमत झाले. यासाठी आठवडाभर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला . मुख्य सचिवांशी चर्चा यशस्वी झाल्यास ते गावी जातील, अन्यथा दिल्लीला कूच करणार आहॆ.
या आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या -
शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात १०% विकसित भूखंड आणि ६४.७% पर्यंत अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
* जानेवारी २०१४ नंतर अधिग्रहित सर्व जमिनींना नवीन कायद्यानुसार बाजारभावाच्या ४ पट मोबदला मिळावा. गौतम बुद्ध नगरचा सर्कल रेटही वाढवावा.
भूमिहीन- शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात यावे.