२३ तारखेनंतर तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणून संबोधणार नाहीत - सुरजेवाला
Max Maharashtra | 16 May 2019 11:22 AM IST
X
X
१३० कोटी जनता या देशाची मालक आहे आणि मालकाचा हुक्म आम्हाला मान्य असणार आहे. तुम्ही बघाल की २३ तारखेनंतर तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणून संबोधणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांची खुर्ची धोक्यात असून निवडणूक आयोग त्यांची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पाच लोक भाजपाचा प्रचार सांभाळत आहेत असं आम्ही आधीच म्हटलं होतं.
निवडणूक आयोगाने आपला कणा दाखवण्याची गरज आहे, मात्र अतिशय थकलेला, दुभंगलेला आणि कमजोर निवडणूक आयोग आपल्याला पाहायला मिळत आहे.
अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे. निवडणूक आयोगाची आचारसंहिता मोदी प्रचारसंहिता बनलीय त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकांच्या पद्धतीवर आता पुनर्विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सरकारच्या मर्जीवर निवडणूक आयोगाच्या नियुक्त्या होणं धोकादायक, ही प्रक्रीया अधिक पारदर्शक असायला हवी अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.
Updated : 16 May 2019 11:22 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire