Home > News Update > तालिबान चा काबुलमध्ये शिरकाव, अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला, काय घडतंय अफगानिस्तानमध्ये?

तालिबान चा काबुलमध्ये शिरकाव, अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला, काय घडतंय अफगानिस्तानमध्ये?

तालिबान चा काबुलमध्ये शिरकाव, अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला, काय घडतंय अफगानिस्तानमध्ये?
X

अफगानिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानी संघटनेनं शिरकाव केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी आपल्या कोर टीमसह देश सोडला आहे. टोलो न्यूज ने आज (रविवारी) हे वृत्त दिलं आहे. तालिबान या कट्टरतावादी संघटनेनं राजधानी काबुल मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी हा निर्णय घेतला आहे. मुल्ला अब्दुल घनी बरादर हे अफगानिस्तानचे नवे राष्ट्रपती असु शकतात.

गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने चारही बाजूने घेराव घातला आहे. त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. कट्टरपंथी समुहाने या अगोदरच अफगानिस्तानच्या अनेक शहरांचा ताबा मिळवला असून आपलं वर्चस्व कायम केलं आहे. फक्त काबूल हेच तालिबानी संघटनेच्या हाती लागलं नव्हतं. परंतु तालिबानी प्रवक्त्याच्या मते त्यांना शहरात जाण्यास नकार देण्यात आला आहे.

तालिबान फौजेने जलालाबाद आणि मजाए ए शरीफ या शहरांवर ताबा देखील मिळवला आहे. राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सद्यस्थितीवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशरफ गनी यांनी शनिवार सांगितलं होतं की, ते या सगळ्या परिस्थिती संदर्भात स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत तात्काळ बोलून काय करता येईल. हे पाहत असल्याचं सांगितलं होतं.

वृत्त संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार अशरफ गनी हे पद सोडणार असून एका तालिबान कमांडरकडे हे पद दिलं जाणार आहे. अफगानिस्तान चे मंत्र्यांनी सत्तेचं शांतीपूर्ण हस्तांतरण होईल. असं सांगितलं आहे.

या दरम्यान, अमेरिकेने हेलिकॉप्टरद्वारे आपल्या दूतावासातील नागरिकांना एअरलिफ्ट केलं आहे. राष्ट्रपती अशरफ गनी यांनी अफगानिस्तान मध्ये अमेरिकेचे विशेष दूत अहमद जल्मेय खलिलजाद सोबत आणीबाणीची बैठक घेतली आहे. अफगानिस्तान चे पूर्व उप विदेश मंत्र्याने ट्वीट करत सांगितंल आहे की, काबुल मध्ये तालिबान नसून सत्तेचं शांतिपूर्वक हस्तांतरण होईल.

तालिबानी प्रवक्ता सुहेल शाहीन यांनी ही आपलं वक्तव्य जारी करून सांगितलं आहे की, फौजेला शहराच्या दरवाजापर्यंतच राहण्याचा निर्देश दिले आहेत. सत्ता हस्तांतरण पर्यंत काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी अफ़ग़ान सरकारची आहे.

अफगान प्रेसिडेंशियल पॅलेस च्या अकाउंटवरून केलेल्या एका ट्वीट मध्ये सांगितलं आहे की, काबुलच्या आसपास अनेक ठिकाणी गोळीबारीचा आवाज ऐकण्यात आला. परंतु सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसोबत मिळून शहर नियंत्रणात आणलं आहे.

दुसऱ्या ट्वीट मध्ये सांगितल आहे की, काबुलच्या काही ठिकाणी गोळीबार झाला आहे. परंतु काबुलवर हल्ला झाला नाही. देशाचं सुरक्षा दल आणि सेना शहरांची सुरक्षेवर मिळून काम करत आहे. सद्यस्थिती नियंत्रित आहे.

काही रिपोर्टनुसार तालिबानी फौज चारही बाजूने शहराच्या आतही शिरकाव करत आहे. खरंतर यांच खंडनही केलं जात आहे. स्थानिकांच्या सांगण्यावरून काही वृत्तसंस्थांनी आणि पत्रकारांनी वृत्त दिलं आहे की शहरात तालिबानी शिरले आहेत.

अफगान मीडिया रिपोर्टनुसार अफगानचे खासदार, स्पीकर आणि राजकारणी पक्षाचे सदस्य काबुल सोडून पाकिस्तानला रवाना झाले आहेत. तालिबान कडून अफगान सरकारवर आत्मसमर्पण करण्याचा दबाव वाढवला गेला आहे.

तालिबान चा प्रवक्ता सुहेल शाहीनकडून सांगितलं की, कुणावरही बदल्याची कारवाई होणार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने देखील इशारा दिला आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना नुकसान पोहोचवल्यास सैन्याकडून कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे तालिबान अमेरिकन लोक काबुलमधून निघून जातील. या दरम्यान अमेरिका दुतावासामध्ये अमेरिकी हेलिकॉप्टर उतरल्याचं पाहिलं गेलं.

Updated : 15 Aug 2021 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top