Home > News Update > आदिवासी लेकराचं यश, आई बापाच्या कष्टाचे चीज; २४ व्या वर्षी मुलगा बनला PSI

आदिवासी लेकराचं यश, आई बापाच्या कष्टाचे चीज; २४ व्या वर्षी मुलगा बनला PSI

Mpsc Result एकीकडे परिस्थितीशी लढत तर दुसरीकडे प्रशासनाशी संघर्ष करत कैलासने वयाच्या अवघ्या २४ वर्षात पोलीस उपनिरीक्षक होतं यश संपादन केल आहे.

आदिवासी लेकराचं यश, आई बापाच्या कष्टाचे चीज; २४ व्या वर्षी मुलगा बनला PSI
X

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातून सरदार सरोवर प्रकल्पामुळे कैलास पावरा यांचा परिवार विस्थापित झाले. चौदा वर्षानंतरही सरकारने आणि प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन केले नाही. पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या पावरा परिवाराकडे ना शेतजमीन, ना हक्काचे घर, अशी परिस्थिती असतानाही कैलासने नर्मदा अभियानाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. पुढे पदवीधर झाला आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तो आता पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

सरदार सरोवर प्रकल्पामुळे अनेक आदिवासी परिवारांचे पुनर्वसन करण्यात आले. काही कुटुंबांना अजूनही शेती आणि राहायला घरं मिळाली नसल्याचं वास्तव आहे. तेच वास्तव मूळगाव सोडून आलेल्या रमेश पावरा आणि चिकीबाई पावरा यांच्या सोबत घडलं. पावरा परिवराचे पुनर्वसन तळोदा तालुक्यातील रोझवा येथे करण्यात आले. मूळ गाव सोडून आल्यानंतरही त्यांना हक्काची जमीन मिळाली नाही. दुसरीकडे या हलाखीच्या परिस्थतीत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मुलही शिक्षण घेत असताना पालकांना कामात मदत करत होते. आज पावरा दांम्पत्याच्या कष्टाला फळ मिळाले असून मुलगा पीएसआय झाल्यानंतर त्यांचा डोळ्यातून आनंदाश्रूंना वाट मिळते.




कैलासचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प.शाळा रोझवा पुनर्वसन येथे तर, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे झाले. त्यानंतर त्याने जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतले. कुटुंबाला हातभार लावतानाच सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू केली. पदवीच्या तृतीय वर्षाला असताना कैलासने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली.


24व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे कैलास पावरा या तरुणाने दाखवून दिलं आहे. कठोर मेहनतीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करून वयाच्या 24व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.



Updated : 12 July 2023 9:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top