आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांची हायकोर्टात धाव
X
Mumbai : कथित खिचडी घोटाळाप्रकरणी सध्या इडी (ED) च्या अटकेत असलेल्या शिवसेना युवा नेते आणि अदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (suraj chavan) यांनी आपली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. १८ जानेवारी त्यांच्यावर इडी कडून कारवाई करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. तसेच विशेष न्यायालयाचा इडी कोठडीचा आदेश सुद्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या इडी कोठडीच्या निर्णयाची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही तसेच सुधारित याचिका करण्यासाठी वेळेची मागणी सुरज चव्हाण यांचे वकील सौरभ भुटाला यांनी केली आहे. आता या याचिकेवर न्यायालयाने 29 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.
सुरज चव्हाण याचिकेत दुरुस्तीसाठी मुभा
सुरज चव्हाण यांना सत्र न्यायालयाने इडी कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली होती. तेव्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत याचिकेत जोडण्यासाठी हायकोर्टाने चव्हाण यांच्या वकिलांना परवानगी दिली व सुनावणी २९ जानेवारीपर्यंत तहकूब केली असल्याचं सांगितले आहे.