Home > News Update > हिंदमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार का? भूमिगत टाक्यांच्या कामाची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी...

हिंदमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार का? भूमिगत टाक्यांच्या कामाची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी...

हिंदमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार का? भूमिगत टाक्यांच्या कामाची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी...
X

हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत हिंदमाता परिसरात प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड येथे टाक्या बांधण्यात येत आहेत. या भूमिगत टाक्यांच्या कामाची आज पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.

नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलारसू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.

टाक्यांचा उपयोग काय?

या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हाय टाईडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल आणि त्यामुळे या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कशा आहेत टाक्या?

या भूमीगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपींग करुन त्या आच्छादित केल्या जातील. मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा आणखीन संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.

Updated : 22 May 2021 9:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top