Aditya Thackeray : सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार
X
राक्षसी महत्वाकांक्षेपोटी हे सरकार आले आहे, त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील चांदिवीलमध्ये एका सभेत ते बोलत होते. शिंदे गटाने केवळ गद्दारी नाही केली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला याचे दुःख आहे, असे म्हणत बंडखोरांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही, ते गद्दार आहेत आणि हे ४० लोक गद्दार म्हणून महाराष्ट्रात फिरणार आहेत, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
हे दोन लोकांचे जम्बो कॅबिनेट आहे, अशी टीकाही त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबावरुन केली आहे. तसेच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.