Home > News Update > Adani पुन्हा दणका ; बाजारात पडझड: SEBI ची नजर

Adani पुन्हा दणका ; बाजारात पडझड: SEBI ची नजर

Adani पुन्हा दणका ; बाजारात पडझड: SEBI ची नजर
X

हिंडरबर्ग (Hinderberg) दणक्यामुळे सलग 21 व्या दिवशी लोअर सर्किटमध्ये जाऊन 85 टक्के पेक्षा अधिक घसरण आणि 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान आणि सेबीने मानक संस्थांना सर्व थकीत मानांकने, अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चा आणि आपला दृष्टिकोन याची माहिती सादर करण्याचे आदेश देऊन अदानीला मोठा दणका दिला आहे.

एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही.

बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गौतम जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतून तिसऱ्या क्रमांकावरून टॉप २५ मधूनही बाहेर गेले.

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, अदानी ग्रुपच्या सात कंपन्याचे शेअर्स सुमारे 85 टक्क्यांनी ओव्हरव्हॅल्यू आहेत. या रिपोर्टनंतर मात्र अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे लोअर सर्किट लागायला सुरुवात झाली. एका महिन्यानंतर काही दिवसाचा अपवाद वगळता रोजच घसरण पाहायला मिळाली.

एका महिन्यात अदानी ग्रुपच्या तीन कंपन्यांचे शेअर्स ८५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर एका कंपनीचा शेअर ७९ टक्क्यापर्यत घसरला आहे. शेअर्समधील इतक्या मोठ्या घसरणीमुळे हिंडेनबर्ग यांची भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा सुरु आहे.

अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्या किती ?

शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या एकूण १० कंपन्या लिस्टेड आहेत.

१. अदानी पोर्ट्स

२. अदानी टोटल गॅस

3. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड

४. अदानी एंटरप्राइजेज

५. अदानी ट्रान्समिशन

६. अदानी पावर

७. अडानी विल्मर

८. अंबुजा सिमेंट

९. एसीसी सिमेंट

१०. एनडीटीवी

किती घसरण झाली ?

हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पण यामध्ये सर्वाधिक म्हणजे अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 85 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक घसरण

हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्टनंतर अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७८.५ टक्के घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर्स २२ फेब्रुवारीला ८३४.९५ रुपयांपर्यंत घसरला आहे. रिपोर्ट पब्लिश होण्याआधी २४ जानेवारी २०२३ रोजी या शेअर्सची किंमत ३८८५.४५ रुपये इतकी होती. आज देखील या शेअर मध्ये घसरण होते आहे.

यासोबतच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सच्या किमतीत ७१.८ टक्क्यांची तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये ७१.४३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर अदानी ग्रुपची सर्वात महत्वाची कंपनी मानली जाणाऱ्या अदाणी एंटरप्राइजेज या कंपनीच्या शेअरमध्ये ६६.५७ टक्क्याची घसरण झाली आहे.

२२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बाजार बंद होत असताना अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये झालेली घसरण

कंपनीचे नाव आणि बाजारातील घसरण (टक्क्यामध्ये)

१. अदानी पोर्ट्स : ४४.९३

२. अदानी टोटल गॅस : ७९.१८

3. अदानी ग्रीन एनर्जी : ८२.३३

४. अदानी एंटरप्राइजेज : ६६.५७

५. अदानी ट्रान्समिशन : ८१.३८

६. अदानी पावर : ६२.४७

७. अडानी विल्मर : ५५.५६

८. अंबुजा सिमेंट : ४४.०१

९. एसीसी सिमेंट : ३७.०३

१०. एनडीटीवी : ६४.८२

सर्वाधिक नुकसान झालेले अब्जाधीश

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी आता २९ व्या स्थानावर घसरले आहेत. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत सुमारे ७५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यावर्षी सर्वात नुकसान झालेल्या अब्जाधिशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

मार्केट कॅपही घटले

बाजारातील सततच्या घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २४ जानेवारीपासून तब्बल ११ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचेबाजार मूल्य एक महिन्याच्या कालावधीत ५७ टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहे.

‘अदानी इफेक्ट’मुळे बाजाराने गमाविले स्थान;

गेल्या महिनाभरात भारतीय शेअर बाजारात माेठे उतारचढाव दिसून आले. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली. त्यातच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रीचा मारा करत भारतातून माेठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतला. परिणामी शेअर बाजारातील एकूण भांडवली मूल्य घसरले आहे. याबाबतीत भारताची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

‘सेबी’ने मागितला अदानी समूहाच्या कर्जाचा तपशील

बाजार नियामक सेबीने क्रेटिड रेटिंग संस्थांकडे अदानी समूहातील कंपन्यांच्या कर्जाची तसेच रोख्यांच्या मानकांची माहिती मागितली आहे. सेबीने मानक संस्थांना सर्व थकीत मानांकने, अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चा आणि आपला दृष्टिकोन याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

अदानी पॉवरसोबतचा करार ओरियंट सिमेंटने केला रद्द

दरम्यान, सीके बिर्ला समूहातील एक कंपनी ओरियंट सिमेंटने अदानी पॉवरसोबतचा महाराष्ट्रातील एक करार रद्द केला आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला बसलेला हा तिसरा मोठा झटका आहे.

एलआयसीला फटका:

हिडेनबर्गच्या अहवालानंतर संकटात अडकलेल्या अदानी समूहाच्या या वादाचा फटका देशांतर्गत गुंतवणूक संस्था भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ला चांगलाच बसला आहे. एलआयसीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकक केल्यामुळे अंदाजे ४९,७२८ कोटींचा फटका बसला आहे. अदानी समूहातील लिस्टेड कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. यात प्रामुख्याने अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट आणि एसीसी आहे.

Updated : 24 Feb 2023 10:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top