Home > News Update > Adani ची अशीही बनवेगिरी... विकीपीडीयावर पेड माहीती

Adani ची अशीही बनवेगिरी... विकीपीडीयावर पेड माहीती

Adani ची अशीही बनवेगिरी... विकीपीडीयावर पेड माहीती
X

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे,रोज शेअर मार्केटमधे अदानींचे शेअर कोसळत असताना विकिपीडियाच्या एका संपादकाने अदानी समूहाच्या माहितीत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. काही लोकांनी पैसे घेऊन अदानी, गौतम अदानींचे कुटुंब आणि कंपन्यांबद्दल चांगल्या गोष्टी लिहिल्याचे उघड झाले आहे.




अब्जाधीश गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने तब्बल एक महिन्यापूर्वी अदानी समूहाबाबत स्फोटक अहवाल प्रकाशित केला आणि तेव्हापासून, अदानी ग्रुपला एकामागून एक धक्के बसत आहे. आता खुल्या इंटरनेट आधारित प्लॅटफॉर्म, विकिपीडियानेही अदानी वादात आघाडी उघडली आहे. एक दशकाहून अधिक काळ 'सॉक पपेट्स'ने उद्योगपती गौतम अदानी, त्यांचे कुटुंब आणि व्यवसाय यांच्याबद्दल अतिशयोक्तीपूर्ण आणि खोट्या कथा लिहिल्या आहेत, असा आरोप विकिपीडियाने केला आहे.

सॉक पपेट्स म्हणजे काय?

सॉक पपेट्स ही इंटरनेटवर सक्रिय असलेली बनावट खाती आहेत जी ब्लॉग, मंच, विकिपीडिया आणि फेसबुक व ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या किंवा मुद्द्याच्या बाजूने जनमत तयार करतात. विकिपीडियाने म्हटले की यापैकी काही 'सॉक पपेट्स' कंपनीचे काही कर्मचारी देखील आहेत आणि त्यांनी चुकीची माहितीचा कंटेन्ट लिहिला आहे आणि विकिपीडियाच्या माहितीचे इशारे काढून टाकण्याचे काम केले आहे.





विकिपीडियाने २० फेब्रुवारीच्या 'मिसलेडिंग इन्फॉर्मेशन रिपोर्ट'मध्ये याचा उल्लेख केला आहे. "त्यांनी (अदानी) आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी विकिपीडिया लेखांशी संबंधित भेदभावपूर्ण PR आवृत्तीद्वारे विकिपीडिया वाचकांना फसवण्याचा प्रयत्न केला का?" अहवालात म्हटले आहे, "त्यांनी नेमके तेच केले." विकिपीडियाच्या अहवालानुसार ४० पेक्षा अधिक 'सॉक पपेट्स' किंवा अज्ञात पेड संपादकांनी अदानी कुटुंब आणि कौटुंबिक व्यवसायांवर ९ लेख लिहिले किंवा संपादित केले. यापैकी अनेकांनी अनेक लेख संपादित केले आणि तटस्थ नसेलला कंटेन्ट लिहिला. विकिपीडियाने सांगितले की या 'सॉक पपेट्स' वर नंतर बंदी किंवा ब्लॉक करण्यात आले.

कोणतीही व्यक्ती विकिपीडियातील कोणाचीही प्रोफाइल संपादित करू शकतो किंवा त्यात सुधार करू शकते. परंतु ते तटस्थतेच्या तत्त्वावर कार्य करते. विकिपीडियानुसार अदानींशी संबंधित काही माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संपादित केली होती. अदानी यांची पत्नी, मुलगा, पुतणे आणि समूह कंपन्यांची माहितीही त्यांनी संपादित करण्यात आली आहे. अदानींबद्दलचा लेख (आर्टिकल) २००७ मध्ये सुरू झाला पण २०१२ मध्ये तीन संपादकांनी त्यांच्याबद्दलची माहिती संपादित केली. अशाप्रकारे कुटुंबातील सदस्य, समूहाची माहितीही संपादित करण्यात आली.

Updated : 22 Feb 2023 11:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top