केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त विधान, पोस्ट होतेय व्हायरल
X
मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडीयावरती वादग्रस्त पोस्ट करुन सामाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला आहे. त्यामुळे केतकी चितळे हीला नेटकऱ्यांनी चांगलंचं ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या ट्रोलींगला देखील केतकी नेहमीच वादग्रस्त रिप्लाय देत असते.
सध्या दिवाळीचा सण असल्याने अनेक लोक फोनद्वारे तर कोणी व्हाँट्सअँप द्वारे शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात. केतकीने शुभेच्छा कशाप्रकारे द्यावेत. यासाठी धर्मांतराचा प्रश्न उपस्थित करत पुन्हा वादग्रस्त प्रश्न निर्माण करुन नेटकऱ्यांनी चांगलेच केतकीला सुनावले आहे.
"प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्मांची माती करु नका, आपण जेव्हा हॅप्पी शब्दाचा वापर करतो तेव्हा हॅप्पी आणि शुभेच्छा या दोन्ही शब्दांचे अंतर समजून घेण्याची गरज आहे. आपण जेव्हा इमोजी वापरतो तेव्हा चीनमध्ये इमोजी हे नववर्षासाठी वापरतात"
धर्मांतरांचा मुद्द्यावर केतकी बोलणं हे नेटकऱ्यांना आवडले नाही त्यामुळे केतकीने आता तरी तोंड बंद करुन बसाव अशी प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी ट्रोलच्या माध्यमातून केतकीला सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी ही केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी असा एकेरी उल्लेख केला होता. तेव्हा नेटकरी चांगलेच संतापले होते. आता धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलणं केतकीला चांगलंच महागात पडू शकत, ही बाबा केतकीच्या लक्षात का नाही आली याचं मात्र नवलंच आहे.