'त्या' वादावक सुबोध भावे चं स्पष्टीकरण
अभिनेते सुबोध भावे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पुण्यातील एका भाषणात त्यांनी राजकारण्यांना नालायक म्हटले आहे. पण या सर्व वादावर आता सुबोध भावे यांनी स्पष्टीकऱण दिले आहे.
X
अभिनेते सुबोध भावे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात राजकारण्यांबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे यांनी बोलताना आपण सर्वजण चांगले शिक्षण, त्यानंतर चांगले करीअर यासाठी विचार करतो. परदेशात जाऊन स्थायिक होण्याचा विचार करतो, पण ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशा
लोकांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. एवढेच नाही तर "आपल्या स्वत:च्या करिअरच्या पलीकडे आपण खरोखर देशाचा विचार करतो का? आपल्याला असे वाटते की ते जे नालायक राजकारणी आपण निवडून दिलेले, ते आपल्या देशाची काळजी घ्यायला आणि त्यांनी काय करुन ठेवले आहे काही वर्षांमध्ये आणि अजूनही काय करत आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे." असे वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले.
त्यानंतर त्यांच्या भाषणातील तो व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर सुबोध भावे यांनी ते संपूर्ण भाषण आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
"काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची.
माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा "संपूर्ण भाषण" त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.
आपला,
सुबोध भावे
असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.