अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा मनोहर भिडेंवर कवितेचा मारा
X
‘शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे प्रमुख मनोहर भिडे (Sambhaji Bhide) यांनी माहात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे समाजात क्रोध निर्माण झाला आहे. मनोहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. ते अनेकदा समाजात तेढ निर्माण होईल असं वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. राष्ट्रपिता माहात्मा गांधी (Gandhiji) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या या वक्तव्यांवरुन राज्याचे राजकारण चांगच तापलं आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटना मनोहर भिडेंच्या विरोधात आहेत. त्यामुळे राज्यभरात जोरदार आंदोलन केलं जात आहे. काही ठिकाणी भिडे यांच्या फोटोला चपला मारल्या, तर कुठे रास्ता रोको करत रोष व्यक्त केला गेला आहे.
दरम्यान आता सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील मनोहर भिडे यांच्या टीका केली आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी इंस्टाग्रामवर (instagram) पोस्ट करत मनोहर भिडेंवर टिका केली आहे. तर अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी कविता पोस्ट करत महात्मा गांधी यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अतुल यांनी इन्स्टाग्रामवर एकाच आशयाचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एक व्हिडिओ मराठीत तर दुसरा व्हिडिओ हिंदीत आहे. यात गांधींची पाठमोरी प्रतिमा दिसत आहे.
अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या कवितेतून नक्की काय म्हटलंय पाहुयात-
अतुल कुलकर्णी यांनी नक्की काय म्हटलं-
तू मर बुवा एकदाचा है असं नसतं करायचं! मारलं की मरायचं !!
ते गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.
पिढ्यान पिढ्या मेल्या तुला मारून, मारून
तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू....
असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस
है बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.
मारलं की निमुट मरायचं असतं !!
तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ
ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो
जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं
मारलं की निमूट मरायचं असतं तू जाऊदे ठीक आहे ...पुढच्या वर्षी नक्की मरं !!!
- अतुल कुलकर्णी