#KisanYouth_SabseMajboot : "किसान युथ सबसे मजबूत" म्हणत युवा शेतकऱ्यांचा दिल्लीच्या आंदोलनात सक्रीय सहभाग
युवा शेतकऱ्यांचा दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी नवीन पिढ्या पुढे येत आहेत.
X
दिल्ली : केंद्राच्या नव्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात पंजाब मधील शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनला आता युवा शेतकऱ्यांचा देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी नवीन पिढ्या पुढे येत आहेत, तरूणही कमी नाहीत हे दाखवत ते सक्रियपणे आंदोलनात भाग घेत आहेत , शेतकरी युवक नेहमीच दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांची पाठशी उभा आहे. "किसान युथ सबसे मजबूत" नारा देत तरुण शेतकरी या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे.
With generations coming up to stand for our farmers, youth is no less
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) August 19, 2021
Actively partaking, Kisan Youth always has the back of farmers fighting at Delhi borders#KisanYouth_SabseMajboot pic.twitter.com/2EnzrDFYmY
केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कायदे मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक युवक एकत्र येत शेतकरी या आंदोलनाला बळ देत आहेत.
दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे करत या आंदोलना संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करत आहेत. या आधी अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत, शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.