फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी सांगून लुटणारे जेरबंद
X
गोंदिया : फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी सांगून राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला अडवून तो ट्रक मजूरांसह पळवुन नेणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत ही कारवाई केली आहे. शुभम सोनकर , विशाल कुशवाह , रोशन सिंग, करण सिंग आणि लुकेश सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.या आरोपींकडून तब्बल 22 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागपुरहून माल भरून गडचिरोली जिल्ह्याच्या बोरी गावाकडे हा ट्रक निघाला होता. राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन निघालेल्या ट्रकला आरोपींनी देवरीच्या मिलन ढाबाजवळ थांबवले. दरम्यान आपन फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी असल्याची बतावनी या आरोपींनी केली आणि ट्रक ताब्यात घेतला.
मात्र मालकाने वेळेवर गाडीचा हप्ता भरला असल्याने चालकाला संशय आला मालकाला फोन लावला असता आरोपींनी त्यांच्या मोबाइल हिसकावुन ट्रक ताब्यात घेत छत्तीसगढकडे नेण्याचा प्रयत्न केला. चालकाचा फोन बंद आल्याने मालकास संशय आल्यावर आपल्या देवरी येईल नातेवाईकास फोन करत देवरी पोलिसात तक्रार केली. दरम्यान पोलिसांनी छत्तीसगढ राज्यकडे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेत चिचोला गावाजवळ संबधित ट्रक व आरोपीला देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.