Home > News Update > गणेश विसर्जन करून येताना अपघात, ट्रक जळून खाक

गणेश विसर्जन करून येताना अपघात, ट्रक जळून खाक

गेल्या दहा दिवसांपासून देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र बुलढाण्यात गणेश विसर्जन करून येताना एपेचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गणेश विसर्जन करून येताना अपघात, ट्रक जळून खाक
X

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र बुलढाण्यातील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव येथे जनुनी तलाव येथे भरधाव ट्रकने एपेला धडक दिली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

नागपुर मुंबई राष्ट्रीय महामार्गवर खामगाव येथील जनुना तलाव येथून गणेश विसर्जन करून एपे परतत असताना जनुना चौफुल्यावर भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामध्ये गणेश मंडळाचे काही लोक जखमी झाले आहे. तर त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एपे आणि ट्रकचा अपघात झालस्यानंतर ट्रगला आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी पोहचली. मात्र अग्निशमन दलाचा पंप नादुरुस्त झाल्याने आग विझवण्यासाठी उशीर लागला. यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्या आगीत ट्रकमधील साबण जळून खाक झाले. त्यामुळे दुसरी अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली होती. मात्र खूप प्रयत्नानंतर ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाली होती.

Updated : 28 Sept 2023 9:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top