राज्यात 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण
X
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६ हजार २१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण त्याचबरोबर राज्यात गेल्या २४ तासात ५ हजारर ८६९ रुग्ण कोरोनामक्त होऊ घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ०५ हजार ८५१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६% एवढे झाले आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ५१ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ % एवढा आहे. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ४८४ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५३ हजार ४०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण आढळले
मुंबईमध्ये दिवसभरात ६४३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुणे शहरात ६७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याची चिंता वाढवणाऱ्या अमरावतीमध्ये कोरोनाचे ५१५ रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर शहरात ५४४ रुग्ण आढळले असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.