चिंता वाढली, २४ तासात राज्यात कोरोनाचे २३ हजार १७९ नवे रुग्ण
X
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून नवीन रुग्णांची सगळ्यात मोठी वाढ गेल्या २४ तासात नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल २३ हजार १७९ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात ८४ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण ९ हजार १३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ % एवढे झाले आहे. पण तरीही रुग्णवाढ मोट्या प्रमाणात होत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या राज्यात ६ लाख ७१ हजार ६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या कोरोना १ लाख ५२ हजार ७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळून आले आहेत. इथल्या २४ तासातील रुग्णांची संख्या २ हजार ६८७ आहे. तर त्यापाठोपाठ पुण्यात २ हजार ६१२, मुंबईत २ हजार ३७७, ठाण्यात ५१६ रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये १२०६ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सरकारने कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. लग्नकार्या, मरण या ठिकाण्चाय गर्दीवर नियंत्रण आणल आहे, हॉटेल्समध्ये ५० टक्के मर्यादा केली आहे, पण तरीही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढत चालली आहे.