Home > News Update > राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ८८ जणांचा मृत्यू

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ८८ जणांचा मृत्यू

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ८८ जणांचा मृत्यू
X

राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १५ हजार ६०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात सलग दोन दिवस कोरोनाचे १५ हजारांच्यावर रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ७ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू द २.३ % एवढा झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळून आले आहेत. इथे दिवसभरात १८२८ रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबुईत १७०९ रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात ३३८ रुग्ण आढळले आहेत तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ४१९ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये ६६०, जळगावमध्ये २८०, पुण्यात १६६७ रुग्ण आढळले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ७७३, औरंगाबादमध्ये ५९१ रुग्ण आढळले आहेत.








Updated : 13 March 2021 8:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top