Home > News Update > अमरावतीतून अभिजित अडसूळ अपक्ष लढणार; नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार

अमरावतीतून अभिजित अडसूळ अपक्ष लढणार; नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार

अमरावतीतून अभिजित अडसूळ अपक्ष लढणार; नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार
X

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातचं अमरावती मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असल्याने नेहमीच वादात राहिलेला मतदारसंघ आहे. अमरावती मतदारसंघ खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरून चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. अशात निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर सत्ताधारी महायुती (Mhayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आाघाडी (Maha Vikas Aghadi) यांनी अजूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही जागांवरील वाद अद्याप कायम असून तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षनेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, महायुतीची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही. कारण अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

रामटेकसारखा राणा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. आधीपासून अमरावती मध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी, बच्चू कडू, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस या सर्व पक्षांचा विरोध नवनीत राणा यांना आहे. नवनीत राणांना विरोध असतांना अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळाल्यामुळे....एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत.

त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झाला आहे.अशातच माध्यमांशी बोलतांना आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, "महायुती मध्ये आमची बोलणी सुरू होती ,नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा वाद आणि त्यावरचा सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे". अभिजीत अडसूळ पुढे म्हणाले "रामटेक मध्ये निकाल आला, त्यांचा अर्ज बाद झाला. तसा राणा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो. भाजपाने हा निर्णय का घेतला? हे आम्ही विचारू शकत नाही. ते अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील असा टोला देखील महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.

मी ही निवडणूक लढणार

नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून महायुतीवर नाराज झालेल्या अभिजीत अडसुळ यांनी मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे असे जाहीरपणे बोलत माध्यमांना सांगितले आहे. नवनीत राणा यांच्यामुळे आम्हा लोकांना त्रास होतो हे सर्व वरिष्ठ स्तरावर कळवले होते. पण त्यांना उमेदवारी दिली, दुर्दैव आहे असं अभिजित अडसूळ म्हणाले आहेत. दरम्यान , भाजपाच्या पाकमंत्र्यांना राणा यांनी बालकमंत्री म्हटलं होतं, कार्यलय फोडलं होतं,

आता जरी हसत दिसले तरी शेवटच्या दिवशी गेम झालेला दिसेल. असा इशारा देत, मी फ्रॉम माझ्या नावाने उचलला आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार असं स्पष्ट करत अभिजित अडसूळ हे निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत आहेत. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांनी सांगितलं की, आपण चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. असं देखील अभिजीत अडसुळ यांच म्हणण आहे.

Updated : 29 March 2024 1:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top