Home > News Update > प्रणव मुखर्जी यांच्या त्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवा, अभिजीत मुखर्जी यांची मागणी

प्रणव मुखर्जी यांच्या त्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवा, अभिजीत मुखर्जी यांची मागणी

प्रणव मुखर्जी यांच्या त्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवा, अभिजीत मुखर्जी यांची मागणी
X

दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 'The Presidential Years' या पुस्तकाचे प्रकाशन थांबवावे अशी मागणी प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी केली आहे. बॅनर्जी यांनी ट्विट करुन संबंधित प्रकाशनाला या पुस्तकाचे प्रकाशन तूर्तास रद्द करण्याची मागणी केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीच यातील काही भाग माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने वाद निर्माण झाला आहे.

त्यामुळेच अभिजीत बॅनर्जी यांनी हे पुस्तक प्रकाशित होण्याआधी आपण एकदा वाचणार आहोत, असे म्हटले आहे. प्रणव मुखर्जी हयात असते तर त्यांनीही प्रकाशनापूर्वी हे पुस्तक एकदा वाचले असते, असेही अभिजीत यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये काही भाग प्रकाशित कऱण्यासंदर्भात आपली कोणतीही लेखी परवानगी घेतली गेली नाही. तसेच काही भाग विशिष्ट हेतूने प्रकाशित केल गेला असल्याने प्रकाशन थांबवावे असे अभिजीत मुखर्जी यांनी सांगितले आहे.

माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या भागात प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, आपण राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसची दिशा भरकटली आणि सोनिया गांधींना पक्षाचे काम हाताळणे कठीण जात होते. तसेच तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा बराचसा कालावधी हा युपीए सरकार वाचवण्यात गेला. त्याचा परिणाम सरकारच्या कारभारावर झाला असेही मुखर्जी यात लिहिल्याचे सांगितले जात आहे.

Updated : 15 Dec 2020 7:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top