Home > News Update > Arnab Goswami ला जामीन मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात आज होणार फैसला...

Arnab Goswami ला जामीन मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात आज होणार फैसला...

अर्णब ची दिवाळी जेलमध्ये च जाणार का? आज होणार फैसला... वाचा काय घडलं आत्तापर्यंत...

Arnab Goswami ला जामीन मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात आज होणार फैसला...
X

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक वाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. अर्णब यांच्यासाठी वकिलांची मोठी फौज तैनात करुनही अलिबाग सत्र न्यायालयात तसंच मुंबई उच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आता या निर्णयाविरोधात अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक, अर्णब गोस्वामी यांनी इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने गोस्वामींचा जामिन नाकारत सत्र न्यायालयात जाण्यासाठी आणि नियमित जामीन मिळण्यासाठी गोस्वामीला कायद्यानुसार उपाय असल्याचे उच्चन्यायालय़ात नमूद केले होते.

उच्च न्यायालयात गोस्वामी आणि अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी दरम्यान त्यांच्या "बेकायदेशीर अटक" ला आव्हान देणारी आणि अंतरिम जामीन मिळविण्याच्या मागणी केली होती. गोस्वामी बरोबर फिरोज शेखचा नातेवाईक परवीन शेख यांनीही आरोपींना जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल फोन वापरत असल्याचे समजल्यानंतर रविवारी अर्णबला रायगड जिल्ह्यातील तळोजा तुरूंगात हलविण्यात आले आहे.

Updated : 11 Nov 2020 9:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top